*आमदार विनायकराव मेटे साहेब यांची रुद्रेश्वर अर्बन क्रेडिट सोसायटी शाखा पाडळसिंगी येथे सदिच्छा भेट*
पाडळसिंगी येथील रुद्रेश्वर अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी ला आमदार विनायकराव मेटे साहेब यांनी भेट दिली या वेळी संस्थेचे चेअरमन गोविंद साबळे व्हाईस चेअरमन नितेश जगताप एम.डी.नवनाथ जाधव व कर्मचारी वृंद सभासद यांनी मेटे साहेबांचा सत्कार केला.तसेच चर्चा करतांना संस्थेच्या कामाविषयी विचारणा केली असता संस्थेचे एम.डी नवनाथ जाधव यांनी रुद्रेश्वर अर्बन मध्ये सभासदांना अनेक विविध सेवा दिल्या जातात त्यामध्ये पाडळसिंगी शाखेचे 3000 सभासद या सेवा घेत आहेत महिला बचत गट असतील, छोटे-मोठे व्यवसाय असतील,व्यापारी वर्ग, शेतकरी वर्ग,नोकरदार वर्ग या सर्व सभासदांना रुद्रेश्वर अर्बन बँक च्या सेवा दिल्या जातात आत्तापर्यंत 1500 सभासदांना संस्थेने कर्ज रुपी आर्थिक सहाय्य केलेली आहे तसेच महिला बचत गटांना महिला उद्योजकांना पण कर्ज रुपी अर्थसाह्य केलेले आहे संस्थेमध्ये खातेदारांना प्रत्येक सेवा ठराविक वेळीत दिल्या जातात म्हणजे खात्यावर पैसे भरणा करण्यासाठी 10 मिनिटांमध्ये पूर्ण व्यवहार केला जातो कर्ज दारास कर्ज घ्यायचे असेल तर 20 मिनिटांमध्ये कर्ज देण्याची सुविधा या शाखेमध्ये दिली जाते.असे जलद गतीने खातेदारांचे काम या शाखेतून करून दिले जातात.त्यामुळे या संस्थेचे खातेदार वाढत आहेत व मार्केटमध्ये संस्थेची चांगल्या कामाची पावती मिळत आहे आतापर्यंत पाडळसिंगी शाखेतून उमापूर,गढी,सिरसदेवी,पाचेगाव, मादळमोही,हिरापूर,पेंडगाव या ठिकाणी खातेदारांना सेवा दिल्या आहेत व या सेवेत सर्व खातेदार समाधानी आहे त्यामुळे अवघ्या दोन वर्षात 8.50 कोटी ठेवी व कर्जवाटप 6 कोटी रुपये आहे चालू मार्चमध्ये अकरा लाख नफा झाला आहे. असा एकंदरीत संस्थेचा पारदर्शक व्यवहार सुरू आहे या कामाचे मेटे साहेब यांनी कौतुक करून भविष्यामध्ये सभासदांना अनेक चांगल्या प्रकारची सेवा देण्याची मार्गदर्शन केले यावेळी उपस्थित प्रसिद्ध सी ए बि बि जाधव साहेब गेवराई तालुका शिवसंग्राम चे अध्यक्ष कैलास माने, चिंतामण शिंदे, रामप्रसाद साबळे, नरहरी साबळे, डॉक्टर नारायण इंगोले,अशोक जोगदंड, राम भांडवलकर,बबलू जगताप,शाखा व्यवस्थापक ईश्वर घाडगे सर्व कर्मचारी उपस्थित होते.